जुन्नर : पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या एका हाॅटेलजवळ बिबट्याची कातडी तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघाजणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे.
साजिद सुलतान मनियार (वय.३२) रा.देवठाण, ता. अकोले, जि.अहमदनगर, शरद मोहन मधे (वय.३२) रा.शेरनखेल, ता.अकोले, जि.अहमदनगर व रामनाथ येशू पथवे (वय.४९) रा. शेरनखेल, ता.अकोले, जि.अहमदनगर अशी अटक करण्यात आलेल्या तिघाजणांची नावे आहेत.
संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की पुणे अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या हाॅटेल फाऊंटन समोर एका गाडीमध्ये बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाची नेमणूक करुन सापळा रचण्यात आला.
यावेळी त्या ठिकाणी ऊभी असलेली पांढऱ्या रंगाची मारुती ८०० गाडी क्रमांक एम एच १५ ए एच ७९६३ यामध्ये तिन इसम संशयीत संशयीत रित्या आढळून आले त्या ठिकाणी छापा टाकला असता त्यामध्ये बिबट्या सद्रुष कातडी आढळून आली त्यांना याबाबत त्यांच्याकडे बिबट्या सद्रुष कातडी बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले.
पुणे : जुन्नर तालुका शिक्षक समितीचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
सदरची कामगिरी पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलिस हवलदार चंद्रा डूंबरे, विनोद गायकवाड, लहानु बांगर, भिमा लोंढे, पोपट कोकाटे, पोलिस काॅन्स्टेबल अमित माळुंजे, मोहन आनंदगावकर, हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार विनोद गायकवाड करत आहेत.
जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे तालुका अधिवेशन संपन्न
डिझिटल नावाखाली अंगणवाडीचे खाजगीकारण करण्याचा केंद्र सरकारचा डाव – शुभा शमीम