Friday, May 17, 2024
Homeक्रीडाविश्वब्रेकिंग : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढ, ५ कोटींची दोन घड्याळ...

ब्रेकिंग : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढ, ५ कोटींची दोन घड्याळ जप्त

Photo : ANI

मुंबई, ता. १६ : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीत फार कमी वेळात यश मिळवले. कमी वेळात त्याने जागतिक क्रिकेटमध्ये खूप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र आता हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. हार्दिक पांड्याकडून ५ कोटी किंमतीची २ घड्याळ जप्त करण्यात आली आहे. 

रविवारी १४ नोव्हेंबर रात्री क्रिकेटपटू हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत दुबईहुन मायदेशी परतला त्यावेळी त्याला मुंबईच्या कस्टम विभागाने रोखले असता हार्दिक पांड्याची ५ कोटी किंमतीची दोन घड्याळे एअरपोर्ट प्राधिकरणाच्या कस्टम विभागाने जप्त केली आहे. पांड्याकडे या घड्याळांच्या बिलाची पावती नसल्याचे मुंबई कस्टम विभागाने म्हटले आहे.

या प्रकरणावर हार्दिक पांड्याने देखील ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, दुबईहून आल्यानंतर मी माझे सामान घेऊन स्वेच्छेने मुंबई विमानतळाच्या कस्टम काउंटरवर मी आणलेल्या वस्तू जाहीर करण्यासाठी आणि आवश्यक सीमाशुल्क भरण्यासाठी गेलो. मुंबई विमानतळावरील कस्टम्समध्ये माझ्या घोषणेबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरली आहे. काय घडले याबद्दल मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. 

मी दुबईतून कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या सर्व वस्तू मी स्वेच्छेने घोषित केल्या होत्या आणि जे काही शुल्क भरावे लागेल ते भरण्यास मी तयार आहे. खरे तर, सीमाशुल्क विभागाने सादर केलेली खरेदीची सर्व कागदपत्रे मागवली होती; तथापि, कस्टम ड्युटीचे योग्य मूल्यमापन करत आहे जे मी भरण्याचे आधीच निश्चित केले आहे. घड्याळाची किंमत ५ कोटी नसून अंदाजे १.५ कोटी आहे. मी देशाचा कायदा पाळणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो. मला मुंबई सीमाशुल्क विभागाकडून सर्व सहकार्य मिळाले आहे आणि मी त्यांना माझे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्यांना हे प्रकरण मिटवण्यासाठी जे काही कायदेशीर कागदपत्रे लागतील त्याची मी पूर्तता करेल. कोणत्याही कायदेशीर सीमा ओलांडल्याबद्दल माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. असे हार्दिक पांड्याने म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय