Dubai : मुसळधार पावसामुळे दुबईत पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील मोठी शहरे, विमानतळ, सर्व रस्ते महापुराने वेढले गेले, सोमवारी येथे अचानक मोठा पाऊस सुरू झाला, बुधवारपर्यंत 24 तासांत तेथे 142 मिमी पाऊस (heavy rain) पडला. यूएईच्या फुजैरा या अमिरातीत सर्वाधिक 145 मिमी पावसाची नोंद झाली.
काही तासातच पडलेल्या पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो स्टेशन्स, रहिवासी अपार्टमेंट सह शहरं पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे दुबईतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) वाळवंटात पावसाचा जोर इतका होता की, देशात सामान्यपणे दोन वर्षांत जितका सरासरी पाऊस पडतो तितका पाऊस एकाच दिवसात पडला. dubai news
पावसाने देशभरात पाणी साचले होते. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा मार्ग पाण्याने भरून वाहत होता. अनेक वाहने पाण्यात अडकून तरंगत होती. नागरिकांची पुराच्या पाण्यातून वाट काढताना तारांबळ उडत होती.
येथे मंगळवारी दुबईमध्ये (dubai) एकाच दिवसात वर्षभराचा पाऊस पडला. त्यामुळे संपूर्ण शहरात मोठा पूर आला असून त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून घरांमध्ये पाणी शिरले आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) च्या राष्ट्रीय हवामान केंद्राने माहिती दिली आहे की मंगळवार दुपार ते बुधवार 17 एप्रिल रोजी सकाळपर्यंत हवामान खूपच खराब होते.
रविवारी आणि सोमवारी ओमानच्या विविध भागात अचानक आलेल्या पुरामुळे किमान 17 जणांचा मृत्यू झाला, असे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीने सांगितले. त्याचबरोबर अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
हे ही वाचा :
मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल
…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात
मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे
ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात
मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?
ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी