Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयBreaking:चिली मध्ये जंगलात भीषण वणवा,123 मृत्यू,1600 बेघर

Breaking:चिली मध्ये जंगलात भीषण वणवा,123 मृत्यू,1600 बेघर

चिली देशात जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा 123 वर पोहचला आहे. तर 1600 हुन जास्त लोक बेघर झाले आहेत. अनेक नागरिक बेपत्ता आहेत. शोधमोहिमेत रस्त्यावर नागरिकांचे मृतदेह सापडत आहेत.


मध्य आणि दक्षिण चिलीच्या जंगलामध्ये आगीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमच्या वतीने आगीमुळे भस्मसात झालेल्या घरांचा तपास सुरु झाला आहे. चिली सरकारने आणीबाणीची घोषणा केली आहे.
आगीमुळे गंभीर झालेल्या अनेक शहरांमध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.विना डेल मार शहरात व इतरत्र शेकडो वाहने जळून खाक झाली आहेत.
सुमारे तीन दशलक्ष लोकसंख्या असलेले विना डेल मार हे शहर एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे,इथे आग मोठ्या प्रमाणात पसरली


चिली हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे
उष्णतेच्या लाटा आणि तापमान वाढ तसेच या दक्षिण गोलार्धाच्या उन्हाळ्यात एल निनो आणि मानव-प्रेरित हवामानामुळे जमीन आणि समुद्राच्या तापमानात दीर्घकालीन वाढ झाल्यामुळे जंगलात वणवे लागत आहेत.
असे WMO च्या अमेरिका क्षेत्रीय कार्यालयाच्या बार्बरा तापिया कोर्टेस यांनी आगीची कारणे सांगितली आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय