मुंबई : आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाच्या वर्ग क व ड वर्गातील विविध पदांसाठी दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.https://t.co/ghC8xrgOzu
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 24, 2021
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण ६,२०५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती, मात्र अचानक ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही परीक्षा उद्या २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी होणार होती. त्यासाठी विद्यार्थी देखील परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.https://t.co/0ztFKO54gt#MahaExam #Jobs #Recruitment
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 24, 2021
दरम्यान, आज सकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या गट – क गट – ड संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू असून परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. मात्र, आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलली आहे.