Thursday, November 21, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : शिंदे, फडणवीस यांच्या नव्या सरकार समोर मोठा पेच

ब्रेकिंग : शिंदे, फडणवीस यांच्या नव्या सरकार समोर मोठा पेच

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. पुढे त्यांनी मी सरकार बाहेर राहील असे सांगितले. मात्र पक्षाच्या आदेशानुसार ऎनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे सर्वानाच धक्का बसला. आता या नव्या सरकारच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या नव्या सरकारला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शनिवारी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. असे असताना आता या नव्या सरकार समोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. कारण नव्या सरकार विरोधात शिवसेने सुप्रीम कोर्टात गेली आहे.

शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी निलंबन नोटीस प्रकरणातील सुनावणी 11 जुलै ऎवजी आजच तातडीने घेण्याची मागणी केली आहे. या सोबतच त्यांनी निलंबनाची नोटीस बजावलेल्यांना बहुमत चाचणीत मतदानाची परवानगी देऊ नका. तसेच बहुमताची चाचणी पुढे ढकला अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय