Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीमुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पात्रता 7 वी पास

मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पात्रता 7 वी पास

Bombay High Court Recruitment 2023 : बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत “शिपाई/हमाल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 160

पदाचे नाव : शिपाई/हमाल

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिपाई/हमालउमेदवार कमीत कमी 7वी पास असावा.

वयोमर्यादा : 24 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : रु.25/-

वेतनमान : रु.15,000 ते 47,600 व नियमाप्रमाणे भत्ते 

नोकरीचे ठिकाण : मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
चारित्र प्रमाणपत्रयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 एप्रिल 2023 

पात्र उमेदवारीकरीताच्या अटी :

1. तो/ती करार करणेस सक्षम असावा/असावी.

2. त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला/तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे

3. त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा.

4. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : 

क्र.परिक्षेचा प्रकारगुणअभ्यासक्रम
1लेखी परिक्षा30 गुणलेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध प्रकारचे प्रश्न असतील. (Objective Type multiple choice questions)
2शारिरिक क्षमता व विशेष अर्हता10 गुण
3तोंडी मुलाखत10 गुण

● उमेदवारांकरीता सूचना :

1. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करतांना शुल्क १२५/- भरणे आवश्यक आहे आणि ते शुल्क परत मिळणार नाही.

2. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

3. अल्प सूचीची यादी (Shortlisting) उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर (https://bombayhighcourt.nic.in) प्रकाशित झाल्यानंतर ज्या अर्जदारांचे नाव अल्प सुची मध्ये आहे त्यांनी शुल्क ११२५/- भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क परत केले जाणार नाही.

● ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना :

1. संगणकीकृत प्रोग्रामद्वारे ऑनलाईन अर्जाची छाननी केली जाईल म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी उमेदवाराने शिपाई / हमाल पदासंबंधीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज हा इंग्रजी भाषेत भरला जाईल.

2. ‘शिपाई / हमाल’ पदासाठी इ. ७ वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. ‘शिपाई/ हमाल’ पदासाठी जर उमेदवार इ. ७ वी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. १० वी किंवा १२ वी असेल व त्याच्याकडे/तिच्याकडे इ. ७ वी चे गुणपत्रक नसेल तर, त्याने/तिने ‘ऑनलाईन’ अर्ज भरताना इ. ७ वी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद करावी जेणेकरुन त्याचा / तिचा अर्ज संगणकाकडून स्विकृत केला जाईल.

● मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय