औरंगाबाद(२२मे) :
देशभर केंद्र शासनाच्या सुचने प्रमाणे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्य सरकारने कामगार कायदे स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कामगार संघटनांनी आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचाच भाग म्हणून सिटूने मराठवाड्यात विविध ठिकाणी आंदोलन केले.
कारखान्यातील कामगाराने गेटवर काळे झेंडें लावून आणि काळ्या फिती छातीवर लाऊन व कामगारांंनी घरासमोर कुटूंबासमवेत निषेध दिन पाळला.
मराठवाड्यात प्रमुख सिटूचे उध्दव भवलकर, लक्ष्मण साक्रूडकर ,दामोदर मानकापे, विश्वनाथ शेळके, शतिस कुलकर्णी, नागनाथ बडे, शंकर ननुरे, गौकुंडे, बसवराज पटने, पवार, पोपुलवार, विलास वंजारे, इत्यादींंनी आंदोलनाचे नेतृत्व केले.