Monday, May 20, 2024
Homeराज्यमहाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात आम आदमी पार्टी राज्य सचिव धनंजय...

महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात आम आदमी पार्टी राज्य सचिव धनंजय शिंदे यांची पोलिसात तक्रार

प्रतिनिधी :- शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात आम आदमी पार्टी राज्य सचिव धनंजय शिंदे यांची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

          भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी काल अत्यंत निषेधार्ह ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिनाला ‘हिंदू साम्राज्य दिवस’ घोषित करून त्याच्याही शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा राजा होते, म्हणजे जनतेचे राजे होते, त्यानां स्वराज्याची कल्पना मान्य होती, साम्राज्याची नव्हे. 

             आता चे बीजेपी शासन हे अगदी महाराजांच्या धोरांनाविरोधी धोरण राबवित आहे, त्यामुळे महाराज यांचे होउच शकत नाहीत, कारण याच विचारसरणीच्या लोकांनी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते व तत्कालीन दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले गेले होते. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीच्या भाजपा कडून सातत्याने रचला जात आहे हे यामधून स्पष्ट होत आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आज संबंधित भाजप नेत्यावर ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. 

            भारतीय दंड संहितेच्या कलम 505(2), 153 A व 298 या कलमांतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

              एकामागून एक मराठी मनात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या अभिमानाच्या, आदराच्या भावनेचा गैरवापर होत असून भाजप स्वत:चे विखारी जातीयवादी, धर्मवादी राजकारण पुढे रेटत आहेत. यामुळे समाजमनात गोंधळ निर्माण होत असून वातावरण कलुषित होत आहे. आज राज्यभरात या घटनेचा आम आदमी पार्टी कडून निषेध व्यक्त करण्यात आला.  संबंधित भाजप नेत्याने याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी नागपुरातून राज्य कोषाध्यक्ष जगजीतसिंह, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखड़े, जिल्हा संयोजक कविता सिंगल, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, जिल्हा सचिव भूषण ढाकुलकर व इतर नेत्यांनी केली आहे, तसेच याचा निषेध व्यक्त केला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय