Sunday, May 19, 2024
Homeराज्यकोरोना नंतरचे जग

कोरोना नंतरचे जग

               जगभर जे सुरु झाले आहे ते सारे धक्कादायक आहे. कोरोनाचा व्हायरस अवघ्या विश्वात धुमाकुळ घालत आहे. आपणास सर्वात काळजी म्हणजे देशात, महाराष्ट्रात, मूबई, पुणे यांची कोरोना रुग्णांची संख्या बळीची संख्या थरकाप उडवणारे आहे.

           किती रे प्रादुर्भाव तूझा

           कोरोना आता बास कर 

           कित्येक लोक मारलास

           झाले आता पुरे कर

              लॉकडाऊनमुळे आणि कोरोनामुळे प्रचंड उलथापालथ झाली. सिर सलामत तो पगडी पचास म्हणायला आंणि धोरण म्हणूनही योग्य असले तरी जीव वाचवताना अर्थव्यवस्थाचा जो बळी जात आहे , त्यामुळे सर्वांचीच घालमेल होत आहे. महिना अखेरपर्यंत कोरोनाचे हे तांडव थांबेल असे वाटत नाही. पावसाळा सुरू झाला आहे. थंडी खोकल्याचे आणि पावसाचे नाते घट्ट आहे. एकुणच काय तर आरोग्यापासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि जीवनापासुन जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टीना नख लागले आहे . शेती, उदयोग, व्यवसाय, व्यापार करमणूक, विकास, सुधारणा. शिक्षण यासह सर्व क्षेत्राला हानी पोहोचली आहे. आज सर्वदूर जी चर्चा आणि मानसिक अवस्था  दिसते आहे. ती पाहता माणसाना निसर्गाशी नवा करारच करायला लागणार आहे. करार नवा असला तरी त्याचा तपशील जुना अणि आपल्या संस्कृतीने सागितलेला आहे.

            महात्मा गांधीच्या तत्वज्ञानात, विचारात या कराराचे सत्व सामावले आहे. ग्रामराज्य रामराज्य हे त्याचे मूळ आहे. “जगा अणि जगु दया” या जुन्या विचाराला पुन्हा अधोरेखित करण्याची गरज आहे . 

          डोकावून बघ आतमधल्या स्वत:ला 

          खोट्या सुखापायी 

          तू कधीच हरवून बसला आहेस 

          जिंदगानीला 

          प्रत्येक गोष्टीत मतलब शोधत 

          बघ आता मीच दुर केल साऱ्या गोष्टीला 

          अनेक दिवस घरात कोंंडून पडलेली माणसे आज जग २५ वर्षे मागे गेले आणि जुनी, नीतीमूल्ये, प्राचीन संस्कृती आणि जीवनपद्धतीचे महत्व स्पष्ट झाले असे म्हणताना दिसत आहेत. आज ना उद्या लाकडाऊन संपेल. कोरोनावर इलाज निघेल पण विषाणूची भीती संपणारी नाही. सामाजिक शिस्त नावाचा प्रकार आपल्या येथे दुर्मिळच, पण या काळात तोही बघायला मिळतोय. कोरोनाच्या भीतीने असो वा पोलिसांच्या, लोक शिस्त पाळायला लागलेत. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची असणारी स्थिती आणि कोरोनाच संकट अत्यंत बिकट परिस्थितीला जन्म घालेल. लोकांनी काही दिवसानंतर जर रोजगार भेटला नाहीतर कोरोनापेक्षा उपासमारीत जीव गेल्याच्या घटना समोर येतील. आपल्याला पुतळ्यांपेक्षा कुठल्याही नेत्यासाठी केलेल्या इव्हेंटपेक्षा हॉस्पिटल, सर्वांना घर शिक्षण आणि अन्न अशा प्राथमिक गरजेच्या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. खेळत्या पैशाच्या अभावाने बाजारात आलेला स्थूलपणा आणि त्यातून वाढलेली बेरोजगारी, बँकेनी दिलेली कर्जाऊ रक्कम परत न आल्यामुळे बँकाचे आलेले दिवाळे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुपयाची घसरणारी किंमत, जीडीपीची सातत्याने होणारी घसरण या सर्व गोष्टी नोटबंदीनंतर सातत्याने आपण पाहतोय. सध्याची भारतीय अर्थव्यवस्था दृष्ट चक्रात सापडली आहे. ज्यामुळे लोकांच्या हातात कामधंदा नाही, पैसे नाहीत. नेमक्या या परिस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हतबलता वाढत चालली आहे. या सगळ्याचा सारासार विचार केंद्रशासनाने करणे गरजेचे होते.

            आपण शहरे, उपशहरे आणि तालुक्यांच्या ठिकाणांचा विचार करून बोलतो, पण बहुसंख्य वस्ती असणाऱ्या खेड्यांचा, दुर्गम डोंगराळ भाग आणि झोपडपट्टी विभागाचा तर विचार करवतच नाही. जर कोरोना साथ महाराष्ट्रातील या भागात पोहचल्यास तेथील परिस्थिती खूपच गंभीर होईल. अजूनही आदिवासी बहुल दुर्गम भागात मनुष्य बळ आणि संसाधनांची कमतरता आहे. याभागाच्या भौगोलिक स्थानामुळे आजपर्यंत जेमतेम सोयी पोहचल्या आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा पायाभूत सुविधांपासून दुर्लक्षित आहे. या जिल्ह्यांमध्ये परिणामी पावसाच्या हंगामात फक्त नदी – नाल्यांना पाणी उपलब्ध असते. या नंतर मार्च महिन्यापासून या लोकांना पाण्यासाठी दूरवर जावे लागते. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठीचा महत्वाचा उपाय म्हणजे साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे पाण्याच्या कमतरेमुळे कदाचित या भागातील लोकांना हात वारंवार धुणे  शक्य होणार नाही. यावर उपाय म्हणून शासनाने               

             सँनिटयझरचे वाटप केले पाहिजे. कोरोनाशी लढा देत असताना यावर नियंत्रणासाठी सर्वाधिक प्रभावी उपाय ठरत असलेल्या लॉकडाऊमुळे  या देशातील लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडवून आणलेत. गत अनेक वर्षांपासून आपल्याच विश्वात गाढ झोपलेल्यांना एका विषाणूने जागे केले. कमी गरजांमध्ये दैनंदिन जीवन कसे जगता येऊ शकते, याचा धडाही दिला. महत्वाचे सामाजिक भान जे कुठे तरी कमी होत चालले होते. ते पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. या संकटकाळी आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव ठेऊन सर्व स्तरातील लोक जमेल तशी मदत करत आहेत.

    

          सुखशांती होती वारेमाप

          खरेदी आणि चैनीचा होत सुकाळ 

          सगळेच एकदा भानावर आले

          जेव्हा अनावश्यक वस्तूचा

          पडला दुष्काळ

 

          लॉकडाऊनच्या या काळात काही समाजात खूप काही बदल होताना दिसत आहेत. लोक कुठलाही जातीभेद, धर्मभेद अथवा पंथभेद न मानता कोरोनासारखेच त्यालाही कोण कुणाचा शत्रू, कुणाचा मित्र याच्याशी काही देणे – घेणे नाही. त्याच्यासाठी  सर्व सारखेच. लोकांनी लग्नसारख्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणाशी सुद्धा तडजोड करून दिलीये. काहींनी कुटुंबातच विधी उरकला. सामाजिक बांधिलकीचे आणखी एक उदाहरण दिल्लीत बघायला मिळाले. तेथील मराठी प्रतिष्ठानने अडकून पडलेल्या  विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी घेवून त्यांना दिलासा दिला. 

             नागपूर मध्ये काही तरुणांनी सोशल कनेक्ट नावाचा देशव्यापी सेतू तयार केला आहे. भुकेलेल्यांना अन्न, आजारींना औषधोपचार ज्येष्ठांना सहकार्य दिले जातेय. या निमित्ताने मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. आरोग्य कर्मचारी व सामांन्याच्या उपयोगात जमेल तशी मदत करत आहेत. विविध स्वरूपातून येणाऱ्या अशा बातम्या या संकटसमयीही उत्साह वाढविणाऱ्या व आशावर्धक आहेत. या काळात घराबाहेर न पडणे हे सुद्धा एक समाजसेवाच ठरणार आहे.

             लॉकडाऊन नंतरचे जग कसे असेल याची चित्र अनेक जण रंगवत आहेत. त्यामुळे त्यात भारतासह अनेक देशांची अर्थव्यवस्था घाईला आली आहे. विकास कमी, महसूल उत्पन्न ठप्प होईल, नोकरी-पगारासाठीही सरकारला कर्ज काढायला लागेल. कायदे बदलतील, बेरोजगारी वाढेल, उद्योग धंदे बंद पडतील. मनोरुग्ण वाढतील, विमानप्रवास, पर्यटन, हॉटेलिंग, चैनीच्या वस्तू, फॅशन, करमणूक यांना मोठा फटका बसेल. आर्थिक संस्थांना संकटांना सामोरे जावे लागेल. मोठे पगार घेणाऱ्या नोकरदारांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. गुंतवणुका अडचणीत येतील वगैरे संभाव्य चित्र वेगवेगळे लोक मांडत आहेत.

          कुठेच थारा नव्हता काल परवा

          कोरोना आला अन्

          माणसाला बरंच काही शिकवू लागला 

          म्हणाला, भल्या माणसा 

          आता तरी स्वतःच स्वतःला नवीन अर्थ दे 

          तरी जगण्याला, दे आता तरी जगण्याला 

          विदेशात आणि महानगरात गेलेले लोंढे पुन्हा गावाकडे वळतायत. गावात आल्याने जमीन व घर वाटपाचे तंटे उद्भवतायत तर काही ठिकाणी लोक जुन्या आठवणींत रम्य आहेत. उत्तम नोकरी हे सूत्र मागे पडेल असे अनेक तर्क केले जात आहेत. त्याच जोडीला भारताने बऱ्यापैकी कोरोनावर विजय मिळवला तर भारतात गुंतवणूक वाढेल आणि नौकरी व्यवसायाच्या संधी वाढतील अशीही शक्यता आहे. माणसांची जगण्याची, विचारांची पद्धत बदलणार हे वेगळं सांगायला नको. कोरोनाच्या या काळात लोकांना देवळे बंद ठेवायला लागली आणि धर्म गुंडाळून ठेवायची वेळ आली. सर्वात मोठी मानवता आणि सेवधर्म यांची प्रचिती आली. लॉकडाउनमुळे निसर्ग नवे रूप घेताना रिचार्ज होताना दिसतो आहे. प्रचंड लोकसंख्या, वाहनसंख्या आणि प्रदूषण आणि निसर्गावर आक्रमण यामुळे निसर्गातील नवलाई लुप्त झाली होती. पण स्वच्छ आकाश दिसते आहे. निसर्ग रिचार्ज होतो आहे. कोरोना हटेल, संकट संपेल, पण निसर्गाने दिलेला हा धडा आणि दाखवलेली नवलाई विसरता येणार नाही. मानव समूहाला निसर्ग रक्षणाचे आणि जीवनशैलीचा नवा करार करावा लागेल.

स्मर्णिका डुबल

विद्यार्थीनी, बायोटेक्नॉलॉजी 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय