कोल्हापूर(२४ मे) :- कोरोनाच्या महामारीने दोन महिने लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. निसर्ग स्वच्छ होत आहे. निळे आकाश नजरेस पडत आहे. पाणी, हवा स्वच्छ होत आहे.
कोरोनाच्या महामारीपुढे कोणाचा टिकाव लागलेला नाही. फक्त लढतायेत ते योध्दा डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी. मंदीरांच्या सुध्दा टाळे ठोकावे लागले आणि सोशल मिडियामध्ये “देवांनी मैदान सोडले” या चर्चेला उत आला होता. परंतु ते खरे ठरले अनेक ठिकाणी देवांना मास्क लावले गेले. परंतु अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा घाटावर उताऱ्यांचा खच पहावयास मिळाला. भारतीय समाज अंधश्रद्धेत किती गुरफटला आहे, याचे हे उदाहरण आहे.
कोरोनाला फक्त विज्ञानच थोपवू शकत आहे, हे समजलेले असतानाही लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. नद्यांनी घेतलेला मोकळा श्वास माणसं पुन्हा कोंढणार अशीच परिस्थिती आहे. पंचगंगा म्हणतेय, “कोल्हापूरकर कधीच सुधारणार नाहीत”. यातून लोकांनी बोध घेण्याची गरज आहे. अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानाची कास धरण्यात स्वतःचे आणि देशाचे भले आहे.