Saturday, May 11, 2024
Homeग्रामीणशिष्यवृत्ती त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा - एसएफआय

शिष्यवृत्ती त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा – एसएफआय

सोलापूर(प्रतिनिधी) :- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय)ने लॉकडाऊन काळात सरकारकडे सतत मागणी केली की, राज्यातील सर्व सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. तरीदेखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून एसएफआयने आज १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना दिली होती. सोलापूर जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाला मिळाला असून विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन शिष्यवृत्ती त्वरीत वाटप करा, स्वधार योजनेची रक्कम त्वरीत खात्यावर जमा करा आदी मागण्या करण्यात आल्या.

             उद्या दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.

            या आंदोलनात एसएफआय चे राज्य सहसचिव व जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, माजी जिल्हाध्यक्ष किशोर झेंडेकर, माजी सहसचिव गणेश भोईटे, सहसचिव शामसुंदर आडम, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव पल्लवी मासन, स.मं.सदस्य राहुल भैसे, जि.क.सदस्य प्रशांत आडम, पूनम गायकवाड, दुर्गादास कनकुंटला, राजेश्वरी पडाल, अश्विनी मामड्याल, अनिल बोगा, प्रियंका कीर्तने, प्रतीक्षा गायकवाड, प्राजक्ता कीर्तने, अयान पेरमपल्ली इ. विद्यार्थी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय