Saturday, May 11, 2024
Homeग्रामीणशिष्यवृत्ती खात्यात तात्काळ जमा करण्याच्या मागणीला घेऊन उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

शिष्यवृत्ती खात्यात तात्काळ जमा करण्याच्या मागणीला घेऊन उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

उस्मानाबाद(प्रतिनिधी):- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया उस्मानाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरीत द्या, स्वधार योजनतेतील रक्कम त्वरित खात्यावर जमा करा आदी मागण्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी शहराच्या विविध भागात आंदोलन केले.

          उद्या दिनांक २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेज करतील आणि त्यातून शिष्यवृत्ती वाटप करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.

         या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष सुदेश इंगळे, अंकुर देशमुख, अजिंक्य बेडके, सूरज धस,ओमकार इंगळे, सौरभ उंबरे, शुभम गाढवे, निलेश विधाते, राहुल जगताप आदीसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय