Thursday, November 21, 2024
Homeराजकारणएसएफआयचे १ जून रोजी शिष्यवृत्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन

एसएफआयचे १ जून रोजी शिष्यवृत्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन

मुंबई(प्रतिनिधी):- शिष्यवृत्तीच्या प्रश्नाला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ च्या वतीने १ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड आणि राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव यांनी सांगितले आहे.

               लॉकडाऊन काळात सरकारकडे सतत मागणी केली की, राज्यातील सर्व सर्व समाज घटकातील, सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. १८ एप्रिल आणि २५ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले होते. तरीदेखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून १ जून रोजी आंदोलन करण्याची हाक सर्व विद्यार्थ्यांना आणि संघटनेच्या जिल्हा समित्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, घराच्या परिसरात, गल्लीमध्ये पोस्टर घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे.

         हे आंदोलन दोन टप्प्यात करण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. १ जून रोजी एसएफआयच्या राज्यातील प्रत्येक जिल्हा समित्यांं लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत शारीरिक अंतर ठेऊन आंदोलन करतील, २ जुन रोजी सकाळी ११ वाजेपासून सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातील विद्यार्थी मेसेजतून शिष्यवृत्ती वाटप करण्याची, तसेच विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी करतील. तसेच त्याच दिवशी संध्याकळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर हॅशटॅगचा वापर करून एक मोहीम चालवली जाणार आहे, असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय