Sunday, April 28, 2024
Homeसमाजकारणआदर्श देवगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नूतन चौक स्थापन

आदर्श देवगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नूतन चौक स्थापन

                            

(वडवणी) :- एक अतिशय दानशूर कर्तुत्ववान, धर्मपरायण कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे चोंडी सारख्या खेडेगावात मानकांजी व  सुशिलाबाई शिंदे या दाम्पत्यांच्या पोटी ३१ मे १७२५ रोजी जन्म झाला. 

     अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाले, अहिल्याबाई एक चाणाक्ष सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या शाळा कडून विद्या प्रसाराचे काम त्यांनी केले वयाच्या  ७० व्या वर्षी १३ ऑगस्ट १९७५ ला कैलासवासी झाले राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे विचार प्रत्येकाकडे आणि समाजबांधव कडे पोहोचावी म्हणून वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाची स्थापना ३१ मे २०२० रोजी करण्यात आली होती नुकतेच गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चौकाचे अनावरण करण्यात आले  यावेळी गावकरी मंडळी व तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय