नाशिक(२१ मे):
सिन्नर तालुक्यातील विडी कारखाना उद्योग अतिशय जुना असूश ५००० च्या वर कामगार काम करतात. विडी कारखान्यामध्ये व घरखेप विडी बांधणीचे काम सुरू असते. गेले दोन महिने लॉकडाऊनमुळे गरीब विडी कामगारांचा रोजगरा बुडाला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील विडी कारखाने सुरू करण्याची मागणी आयटक च्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याचे बोलले आहे. 5000 कामगारांचा रोजगाराचा प्रश्न यामुळे सुटणार आहे.
यावेळी राजू देसले, नारायण आडळे, म्हाळू पवार, रेणूका वंजारी, रूपा निलेश बल्लेवार आदी उपस्थित होते.