Friday, May 3, 2024
Homeग्रामीणकोरोना विरोधी संघर्षातील खटावच्या योद्धा :प्रियांका अवघडे

कोरोना विरोधी संघर्षातील खटावच्या योद्धा :प्रियांका अवघडे

सातारा(प्रतिनिधी) :

     देश कोरोना विरोधात लढत आहे. केंद्र आणि राज्य शासन आपापल्या परीने लढा तर देतच आहे. राज्य शासनाने राज्यातील मोठमोठ्या खासगी दवाखान्यांनाही सोबत घेतलेले आहे. अशाच हॉस्पिटल मधील डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी कोरोनाविरोधात लढ्यात खंबिर भूमिका पार पाडत आहेत.

         खटाव तालुक्यातील चोराडे गावातील कन्या प्रियांका अवघडे ह्या देखील कोरोना विरोधातील युद्धामध्ये सक्रिय आहेत. प्रियांका अवघडे या पुणे जिल्ह्यातील कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये “परिचारिका” म्हणून सेवा बजावत आहेत. काही दिवसापूर्वी त्या गावाकडे खटाव तालुक्यात येण्याचा त्यांचा विचार होता. गावाकडे येण्याच्या दृष्टीने तयारी झाली आणि अचानक “कोरोनाचं ” मोठं संकट येऊन उभं राहिलं. प्रियांकाने विचार बदलला आणि कामाला लागल्या. कोरोनाच्या काळात वरिष्ठांना परिचारिका म्हणून जी मदत लागेल ती त्यांनी केली. 

           विलगीकरण मध्ये असणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांशी आपुलकीची भाषा, त्याच्याशी हॉस्पिटल चा एक प्रतिनिधी म्हणून त्यांना दिलेली आणि देत असलेली सेवा खरंच वाखाणण्याजोगीच आहे. त्यांच्या आपुलकीच्या भावना पाहून रुग्ण आजारातून निम्मे बरे होतं असल्याच्या प्रतिक्रिया ही रुग्णांच्या काही नातेवाईकांनी बोलून दाखविल्या. एकंदरीत प्रियांकाच्या या सेवाभावी वृत्तीचा चोराडे गावासह खटाव तालुक्याला अभिमान वाटत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय