Friday, May 10, 2024
Homeराजकारणनुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या - काॅ.अर्जुन आडे बोगस बियाणे...

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या – काॅ.अर्जुन आडे बोगस बियाणे देणाय्रा कंपनी व दुकानदारावर गुन्हे दाखल करा

नांदेड :- (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात सोयबीण पिकाचे बोगस बियाणे दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पेरलेले बियाणे निघालेच नाहीत. आसमानी अाणि सुलतांनी सकंटाने आधिच शेतकरी बेहाल झाला आहे. अशात बोगस बियाणे शेतकऱ्यांना ञस्त करुन सोडले आहे.बोगस बियाणे देणाऱ्या कंपणी, दुकांनदांवर फोजादारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी काॅ.अर्जुन आडे यांनी केले आहे.किनवट तालुक्यात अनेक भागात पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही .

या मागणीसाठी  मा.क.पा च्या वतिने कृषी अधिकारी किनवट यांना निवेदन देण्यात आले.

     यावेळी कृषी अधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेत तातडीने बोगस बियाण्यामुळे नुकासान झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सह्ययाकडे अर्ज करावे, अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आश्वासन कृषी अधिकारी यांनी दिले.

      शेतकऱ्यांनी लवकर अर्ज करुन पाठपुरावा करावे ,जर कृषी साह्यक प्रतिसाद देत नसतील तर मा.क.पा च्या कार्यकर्यांना  संपर्क करावे .कृषी विभागाने सहकार्य केले नाही तर जोरदार आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतांना मा.क.पा चे काॅ.जनार्दन काळे, स्टॅलिन आडे आदि उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय