Thursday, November 21, 2024
Homeसमाजकारण'लोकपर्यावरण मंच व एसएफआय'च्या वतीने पर्यावरण दिन साजरा

‘लोकपर्यावरण मंच व एसएफआय’च्या वतीने पर्यावरण दिन साजरा

कोल्हापूर :- आज जागतिक पर्यावरण दिनाने औचित्य साधून लोक पर्यावरण मंच आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी एका अनोख्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा केला. सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून घरीच सुरक्षित शारीरिक अंतर पाळून पर्यावरणाची घोषवाक्य आणि सुविचार एका पोस्टरवर लिहून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 

       लोक पर्यावरण मंच गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचे सक्रिय काम करत आहे. त्याअंतर्गत पर्यावरणाचे विद्यार्थी गट स्थापन करून, त्यांना पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सोपवणे, वृक्षारोपण करणे, त्यांचे संगोपन करणे यासारखी कामे या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर सुरू असतात.

         मागील वर्षी महापुराने ग्रस्त असणाऱ्या भागांचा दौरा करून त्या गावातील विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम केला. सध्या लोक डाऊन मुळे पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या विषारी कंपन्या बंद आहेत. हवेच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाली आहे. नद्यांमध्ये जागोजागी स्वच्छ पाणी दिसत आहे. निसर्ग पुन्हा मूळ रूपावर येत आहेत. हे असेच चालू राहावे यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन पर्यावरणाचे कायदे आणखीन कठोर करून अनोख्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करावा, अशी मागणी या निमित्ताने लोक पर्यावरण मंच आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. 

           या उपक्रमात सर्वेश सवाखंडे, रत्नदीप सरोदे, प्रेरणा कवठेकर, नवनाथ मोरे, तुषार सोनुले, मालोजीराव माने, विनय कोळी आदींंनी सहभाग घेतला.

संबंधित लेख

लोकप्रिय