Tuesday, May 7, 2024
Homeकृषीशेतकऱ्याला दिलासा १५ जुलै पर्यंत करणार मका खरेदी - छगन भुजबळ

शेतकऱ्याला दिलासा १५ जुलै पर्यंत करणार मका खरेदी – छगन भुजबळ

नाशिक : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजने अंतर्गत मका खरेदी साठी १५ जुलै पर्यंत मुदवाढ दिली आहे. नऊ लाख क्विंटल खरेदी करण्यास परवागी दिली होती. त्यात अडीच लाख क्विंटल पहिलेच खरेदी केली आहे.

    या वर्षी मका चे पीक हे जास्त प्रमाणात झाले होते आणि पावसाच्या दिवसात शेतकऱ्याकडे साठवणूकीसाठी जागेची कमतरता अभावी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने ही मागणी लावून धरली.त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्र शासनानाला तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे.

     या मुळे मका शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्याकडे असलेला सर्व मक्का खरेदी केला जाणार आहे असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय