प्रतिनिधी:- देशात आणि राज्यात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाशी दोन हात करताना, निसर्ग देशासमोर अनेक मोठं मोठी आव्हाने निर्माण करत आहे, ओडीसा, पश्चिम बंगाल मध्ये आलेल्या अंफान तुफानने मोठे नुकसान केले, त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे आलेल्या टोळधाडमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले असताना आता महाराष्ट्रात अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे पुढील दोन दिवसात या चक्रीवादळाचा प्रभाव रायगड पासून मुंबई, ठाणे पालघर गुजरात पर्यंत राहणार आहे. बुधवारी वाऱ्याचा वेग ताशी १२० किलोमीटरवर पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्लात उभारण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रातील १५० रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने १,००० खाटांचे हे केंद्र पालिकेला उभारून दिले होते. बीकेसीतील मैदानात उभारण्यात आलेल्या या केंद्रावर पावसाचा कोणताही परीणाम होणार नाही. तसेच ८० ते १०० किलोमिटर वेगाच्या वाऱ्यामध्ये ही रुग्णालयाचे बांधकाम टिकाव धरेल. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून येथून रुग्ण हलविण्यास सुरवात करण्यात आली आहे. आता पर्यंत ६० रुग्णांना हलविण्यात आले आहे
या अगोदर हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पावसामुळे विज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व रुग्णालयांना जनरेटर तयार ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.