Friday, May 10, 2024
Homeग्रामीण'शिष्यवृत्ती त्वरित वितरित करा' या मागणीला घेऊन या विद्यार्थी संघटनेने सामाजिक न्याय...

‘शिष्यवृत्ती त्वरित वितरित करा’ या मागणीला घेऊन या विद्यार्थी संघटनेने सामाजिक न्याय मंत्र्यांना मेसेज करण्याची मोहिम राबवली.

प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित वितरित करण्याच्या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज सामाजिक न्याय मंत्र्यांना मेसेज करण्याची मोहीम राज्यभरात राबविण्यात आली. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

          एसएफआयने लॉकडाऊन काळात सतत मागणी केली की, राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वितरित करा. तरीदेखील सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून एसएफआयने १ जून रोजी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्यात आले. आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मेसेज करण्यात आले. 

          दिनांक ३ जून रोजी संध्याकळी ५ ते ७ यावेळेत ट्विटरवर एक मोहीम चालवली जाणार असून मोहीमेत सहभागी होण्याचे आवहान स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय