Saturday, May 11, 2024
Homeग्रामीणशिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांना वडवणी मधील २ तरुणांनी दिला मायेचा आधार

शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांना वडवणी मधील २ तरुणांनी दिला मायेचा आधार

वडवणी(प्रतिनिधी) :-

          वडवणी  तालुक्यामध्ये आघाडी शासनाने एक उपहारगृहाला   शिवभोजन थाळीला परवानगी दिली. या थाळीमध्ये लाॕकडाउनच्या  कालावधीत शासनाने ५ रुपयांमध्ये ३० ग्रॅम वजनाच्या २ चपात्या १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम चा भात तर १०० ग्रॅम वजनाची एक वाटी वरण याप्रमाणे शिवभोजन थाळीला जेवन मिळण्याची सुविधा चालू केली.

    याशिवाय भोजन थाळी साठी शहरी भागात पन्नास रुपये किंमत तर ग्रामीण भागासाठी ३५ रुपये किंमत आधार होत म्हणजे आली आहे या शिव भोजन थळी साठी लाभार्थ्यांकडून या कालावधीत फक्त पाच रुपये जमा करून घेतले जातात ५० पैकी पाच रुपये ग्राहकाकडून वसूल केल्यास शिवभूषण फळीचे शुल्क ४५ रुपये उपहारगृह मालकाला मिळतात या सर्व पार्श्वभूमीचा विचार करतात वडवणी येथील दोन समाज सेवकांनी श्री कैलास बाबुराव भुजबळ व श्री नारायण कंडक्टर यांनी २० मे ते ३१ मे २०२० या कालावधीत पाच रुपये प्रमाणे लाभार्थ्याची शुल्क ७५ लाभार्थ्याची स्वरूप एक रकमी या उपहार ग्रहकाच्या मालकास स्वतःच्या खिशातून दिले आहेत

कोरोना महामारीच्या काळात या दीन ,दलित ,दुबळ्या ग्राहकांना, लाभार्थ्यांना एक रुपयाची प्राप्ती नाही. हाताला काम नाही. दोन पैसे खात्यावर जमा नाहीत. कोणाला पाच रुपये मागितले तर तोही देण्याचा प्रश्न नाही. हे पाच रुपये परत कसे आणि कुठून द्यावे.असा प्रश्न यांना भेडसावत आहे. पोटात अन्नाचा कण नाही आणि उन्हात उभे राहून हे लाभार्थी थाळी घेण्यासाठी तासनतास थांबत असतात जर का ७५ लाभार्थी यापेक्षा अधिक लाभार्थी झाले तर थाळी मिळत नाही म्हणून एक -दीड- दोन तासांनी अगोदर लाभार्थी रांगेत उभा राहून ही थाळी घेण्यासाठी तासनतास तिष्ठत असतात .काही लाभार्थ्याकडे हे पाच रुपये शुल्क देण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. पाच रुपये नाहीत असे म्हटल्यानंतर या लाभार्थ्याला बाजूला काढले जाते .बऱ्याच वेळा हे पाच रुपये कोणालातरी मागून घ्यावे लागतात ही अडचण येथील तरुणांनी लक्षात घेऊन कैलास बाबुराव भुजबळ व नारायण गुरसाळी या दोन होतकरू तरुणांनी स्वतःच्या खिशातून या सर्व लाभार्थ्यांचे पैसे एक रकमी या उपाहारगृहाच्या मालकाला ३१ मे पर्यंत दिलेले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांची फार मोठी समस्या संपलेली आहे .खरं म्हणजे या २ तरुणांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे .परिसरातील असंख्य लाभार्थ्यांनी या तरूणांचे मनोमन आभार मानले. आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाहीत .अशा  प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय