Monday, May 20, 2024
Homeग्रामीणकोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन; ह्या केल्या मागण्या.

कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन; ह्या केल्या मागण्या.

प्रतिनिधी :-  कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलेने घरेलू कामगारांना काम नाही. या बंद काळात त्यांना पगार पण मिळालेला नाही . त्यामुळे त्यांची अवस्था फार बिकट व कठीण बनलेली आहे . म्हणून त्यांना शासनाकडून रुपये १०,००० अनुदान मिळावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

            घरेलू कामगारांना काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना सन २०१४ सालापर्यंत १० हजार रुपये सन्मानधन मिळाले होते . सन २०१५ पासून भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी ते बंद केले असून आजपर्यंत त्यांना कांहीही सवलत मिळालेली नाही .

बांधकाम कामगारांना त्यांच्या कल्याणकारी मंडळाकडून २३ योजनांची सवलत मिळते. त्यांची नोंदणी फी वर्षाला १२ रुपये घेतली जाते. मात्र घरेलू कामगारांना कोणतीही सवलत नसताना नोंदणी फी रु ९०. घेतली जाते. ही बाब अन्यायकारक असल्याने घरेलू कामगारांचीही नोंदणी फी १२ रुपये घेणेत यावी अशी आमची मागणी असल्याचे संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस पार्वती जाधव यांनी म्हटले आहे.

         घरेलू कामगारांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असेने त्यांना सत्तर पंच्याहत्तर वर्षे वय झाले तरी देखील काम करावे लागत आहे . त्यासाठी त्यांच्या नोंदणीची वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय