नमस्कार,
कसे आहात ? गावातल्या अंगणात की ट्राफिक जॅम शहरात? तुम्ही कोठेही असाल मला माहित आहे. तुमचा गाव तुमच्या हृदयात वसला आहे.
आजकाल कमी झालं असेल गावाकडं येणं- जाणं , आधी सुट्टीत जायचा आता कामानेच तुमची सुट्टी केलीये, किंवा अजूनही नियमित जाताय गावी आणि रिफ्रेश होऊन येता ना सगळं विसरून आणि गुंतून जाता कामात तुम्ही भान विसरून असो. तरीही तुमचं तुमच्या गावावरच प्रेम काही कमी होत नाही, मग त्या गावासाठी काहीतरी करायचं राहून गेलेलं स्वप्न आता मिळुन पूर्ण करा.
चला तर मग खारीचा वाटा उचलून आपल्या गावासाठी एकत्र येवूया. आपल्या गावासाठी काहीतरी करूयात. चला फक्त फेसबुक लाईक पेक्षा अधिक काहीतरी करूयात ! Together We Can! सर्वांनी मिळून बदल घडविण्याच्या चळवळीत स्वागत. यामधून आपण आपल्याला जे करता येईल जे शक्य असेल. तशी मदत तुम्ही गावाच्या विकासासाठी करु शकता. यासाठी आपल्याला आपले कायदे माहित असणे गरजेचे आहे, ही अवस्था आपल्यापासून दूर नाही. आपल्याशिवाय ती अपुर्णच. आपण एकत्र असं गरजेचं आहे. आणि आपण काही करु शकलो नाही तर आपल्या शिक्षण घेतलेचा काही उपयोग आहे. असं मला वाटत नाही.
तुमच्या गावतसुद्धा हे घडू शकत.कारण लोकं वर्दीतल्या आणि शासकीय व्यवस्थेला सलाम ठोकत आहेत. चुकीचे असले तरी आणि स्वतःला सुशिक्षित समजणारे पासून हे सर्व या पासून अज्ञात आहेत.
So let’s think over it and work together for it. share your ideas with each other.
घरात बसून गावाचा विकास कसा करणार असा प्रश्न साहजिकच आहे. पण काहीच न करण्यापेक्षा काय करणं गरजेचं आहे. याचा अभ्यास करून आवश्यक आहे. जे गावी आहेत त्यांनी कोठून सुरुवात करावी, कोणते प्रश्न आहेत. सध्या हे मांडावेत. कोणास काही शंका असल्यास विचारावे. सगळे एकदा भेटून कस करायचे हे ठरवा. पण सध्या कोरोनामुळे आपण गावासाठी असणाऱ्या योजनांचा अभ्यास करू शकतो.
सर्वांनी छान कल्पना मांडा आणि विचार करा. एवढा निधी मिळतो, या आधी पण मिळत होता; पण गाव सुधारणा दिसली का तुम्हाला नाही. म्हणूनच तुम्ही एकत्र येऊन अशा चांगल्या कायद्याच ज्ञान स्वतः घ्या. आणि गावात जाऊन हे पटवून देवूया. गावकरी यांनी आपल्या हिताचे उपक्रम राबविणे रोजगार निर्मिती साठी काम करणे, पाणीपुरवठा व शाळांची स्थिती सुधारणे अशी कामे करण्याबाबत विचारणा करणं गरजेचं आहे. हे आपल्याला समजतंय वाचून याची व्याप्ती फक्त समजून सांगायची आहे. हेच तुमचं काम आहे.
गावकरी यांनी ग्रामसभेत मागणी केली तर याचविचार होऊ शकतो. पण आपला गावकरी ग्रामसभेत जातो की नाही इथून प्रश्न निर्माण होतो. त्यांना त्याच महत्व त्यांचे अधिकार समजून देणं हे आपलं काम आहे. गावासाठी हे तुमचं छोटंस काम गावाच्या विकासात नक्कीच हातभार लावू शकते. आपल्या कडे सर्व प्रकारचे लोक आहेत, सरकारी अधिकारी कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत. इंजिनिअर आहेत प्रकल्प अधिकारी आहेत. सुशिक्षित आणि कष्टकरी लोक आहेत गरज आहे. एकत्र येऊन विचार करून एक दिशा देण्याची अस केलं तर नक्कीच प्रत्येक गावात पाणी, चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य, एक ग्रंथालय, संगणक ज्ञान, रोजगार उपलब्ध होईल. आणि मुलांना जावं लागणार नाही, शहरात कामासाठी बघा तुमची साथ विचार हे घडवून आणू शकते. सध्या तुमच्या गावी आहात तर या गोष्टी ची चर्चा नक्की करा. आपण सण वगैरे या निमित्ताने गावी जातो; पण केव्हा तरी ग्रामसभा आहे. या निमित्ताने गावी जाऊन गावातील विकास कामे…अडीअडचणी जाणून घेऊन त्या बद्दल चर्चा केली आणि त्या बद्दल माहिती गावातील सुजाण ग्रामस्थांना दिली तर ती एक प्रगती चा दिशेने वाटचाल ठरू शकते.
त्यामुळे तुमच प्रत्येकाच मत गरजेचं आहे. तरी काय वाटतं ते सांगा एकमेकांना सांगून एकत्र या. ग्रामसभा किती वेळा घेतल्या जातात, कोणाला माहीत आहे का?
आपली सुरुवात इथून आहे बघा ! नुसतं मी शहरातला तरुण आणि सुट्टी ला गावी जातो बॅग भरून ! यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे. हे आवाहन स्वीकारा आणि छोट्या कामांतून सुरुवात करूयात!
अमृता घुटे, जुन्नर