Monday, May 20, 2024
Homeग्रामीणपैठण शहरातील नविन कावसान लक्ष्मीनगर प्रभागाच्या विकासासाठी चार कोटींचा निधी मंजूर...

पैठण शहरातील नविन कावसान लक्ष्मीनगर प्रभागाच्या विकासासाठी चार कोटींचा निधी मंजूर…

पैठण:- पैठण शहराच्या विकासासाठी 12 कोटी 34 लाख इतका भरघोस निधी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी मंजूर करून आणला असून मंजूर बारा कोटी 34 लाख रुपयांमध्ये शहरातील पुनर्वसित भाग व नवीन वसाहत असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील नवीन कावसान व लक्ष्मीनगर च्या विकासासाठी चार कोटी इतक्या भरघोस निधीची तरतूद केलेली आहे. अशी माहिती प्रभागाचे नगरसेवक तुषार पाटील व कृष्णा मापारी यांनी दिली.

कोरोनामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रभागातील विकासकामे निधी अभावी खोळंबली होती. याबाबत प्रभागाचे नगरसेवक तुषार पाटील व कृष्णा मापारी यांनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे वेळोवेळी भेट घेऊन पाठपुरावा केला होता. मंत्री भुमरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली व ऐतिहासिक, धार्मिक वारसा असलेल्या पैठण शहर व शहरातील पुनर्वसित भाग म्हणून परिचित असलेल्या नवीन कावसान व नवीन वसाहत झालेल्या लक्ष्मीनगर भागातील विकास कामे करण्याकरिता निधी द्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली त्यामुळे पैठण शहरात विकासकामांसाठी 12 कोटी 34 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीत प्रभाग क्रमांक चार कावसान-लक्ष्मीनगर च्या विकासासाठी चार कोटी इतक्या भरघोस निधीची तरतूद मंत्री संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे अशी माहिती तुषार पाटील व कृष्णा मापारी यांनी दिली.

या मंजूर निधीतून प्रभागातील जकात नाका ते आयटीआय सीसी रस्ता, दत्त मंदिर येथे डोम उभारणे,नवीन कावसान भागात सिमेंट रस्ते करणे व सिमेंट पाईपमध्ये नाली करणे तसेच स्ट्रीटलाइट उभारणे, साई कॉलनी येथे सिमेंट पाईप मध्ये नाली करणे, लक्ष्मीनगर भागात पिण्याचे पाईपलाईन करणे, सोनवणे ते मानमोडे घर से रस्ता करणे, सलीम शेख ते झिणे रस्ता करणे, भाऊसाहेब नगर येथे सीसी रस्ता व सिमेंट पाईप मध्ये नाली करणे तसेच नाथ कॉलनी येथे सिमेंट पाईप मध्ये नाली करणे सह आदि विकास कामे मंजूर निधीतून केले जाणार आहेत.

 प्रभाग क्रमांक चार कावसान,लक्ष्मीनगर,भाऊसाहेबनगर,साई कॉलनी,नाथ कॉलनी च्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भुमरे तसेच सभापती विलास बापू भुमरे यांचे प्रभागाचे नगरसेवक  तुषार पाटील व कृष्णा मापारी यांनी प्रभागाच्या वतीने आभार मानले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय