Friday, November 22, 2024
Homeकृषीकेंद्र सरकारने साखरेच्या विक्री दरात केली वाढ, वाचा सविस्तर

केंद्र सरकारने साखरेच्या विक्री दरात केली वाढ, वाचा सविस्तर

नवी दिल्ली:-साखरेच्या विक्री दरात किलोमागं २ रुपये वाढ देण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रीगटानं केली आहे. त्यामुळे आता हा दर प्रतिकिलो ३३ रुपये इतका होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २० हजार कोटी रुपयांची थकबाकी देणं साखर कारखान्यांना शक्य व्हावं यासाठी मंत्रिगटाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, अन्नमंत्री रामविलास पासवान, कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर, आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित होते. कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी देता यावी, यासाठी निती आयोगाच्या शिफारसीनुसार साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली, तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचे निर्देश या मंत्रिगटानं अन्न मंत्रालयाला दिले. या दरवाढीचा लक्षणीय परिणाम दिसला नाही, तर इतर पर्यायांचा सरकार विचार करेल, असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित लेख

लोकप्रिय