छत्रपती शंभुराजे स्मारक थांबवणे म्हणजे शंभूराजेंचा अवमान – काशिनाथ नखाते
पिंपरी चिंचवड : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक वढू तुळापूर येथे होणार असून या विकासा आराखड्यासाठी २६९ कोटी रुपयांचा भरीव निधी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मंजुरी केला होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने या कामाचे पुन्हा सादरीकरण करा, असे आदेश देऊन स्मारक गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे. हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हा छ.संभाजी राजेंचा व संभाजी भक्तांचा घोर अवमान आहे. सध्याचे सरकार हे प्रतिशोधाची भावना ठवणारे आहे काय? अशी शंका निर्माण होते आहे, सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा कष्टकरी संघर्ष महासंघ आंदोलन करेल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र बांधकाम कामगार महासंघातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला निगडी येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथे सरकारच्या प्रतिशोध धोरणाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी आबा शेलार, राजेश माने, नाना कसबे, ओम प्रकाश मोरया, फरीद शेख, तुकाराम कदम, कासिम तांबोळी, सहदेव होनमाने आदी उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर