Tuesday, January 7, 2025
Homeताज्या बातम्याशिर्डी साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करा, भाजप नेत्याची मागणी

शिर्डी साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करा, भाजप नेत्याची मागणी

Sujay Vikhe on Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात. साई संस्थानाच्या प्रसादालयात दररोज हजारो भक्त मोफत भोजनाचा लाभ घेतात. सामान्य दिवशी ५० ते ६० हजार, तर शनिवार-रविवारी ७० ते ८० हजार भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र, भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करण्याची मागणी केली आहे.

भाजप नेते सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मोफत भोजनामुळे महाराष्ट्रातील अनेक भिकारी शिर्डीत गोळा होत आहेत. हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी वापरला जावा, असे म्हटले आहे. सुजय विखे यांच्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. साई भक्तांनी सुजय विखे यांच्या मागणीचा तीव्र विरोध केला आहे. तर काही साई भक्तांनी विखे यांच्या भुमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करावे की नाही, हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. भाविक आणि नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून, यावर साईबाबा संस्थानकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, साईबाबा संस्थानकडे (Shirdi Sai Baba Temple) साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी राखीव असून, तो अन्य कारणांसाठी वापरता येत नाही. देणगीदार साई भक्तांनी वर्षभरासाठी अन्नदानाची बुकिंग करून ठेवली असल्याने अन्नदानाचा आर्थिक बोजा संस्थानावर पडत नाही.

Sujay Vikhe on Shirdi Sai Baba

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

संबंधित लेख

लोकप्रिय