HMPV Virus : कोरोनाच्या दहशतीनंतर आता चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) या नवीन विषाणूने कहर माजवायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर आणि विविध रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, या विषाणूमुळे रुग्णालये आणि स्मशानभूमी भरून गेली आहेत. मात्र, चीनच्या सरकारकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, चीनचे रोग नियंत्रण प्राधिकरण अनोळखी प्रकारच्या निमोनियासाठी एक विशेष निरीक्षण प्रणाली चालवत आहे. थंडीच्या काळात श्वसनाशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता असल्यामुळे यासाठी एक विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे.
एचएमपीव्ही हा आरएनए प्रकारातील विषाणू असून, तो खोकला आणि शिंकण्याने होणाऱ्या थेंबांद्वारे व्यक्ती ते व्यक्ती संक्रमित होतो. 2001 मध्ये डच संशोधकांनी या विषाणूचा शोध लावला. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकतो.
HMPV Virus ची लक्षणे
या संसर्गाच्या संपर्कात आल्यानंतर 3 ते 6 दिवसांत सर्दीसारखी सामान्य आणि सौम्य लक्षणे दिसतात. परंतु काहीवेळा ते गंभीर स्वरूप धारण करते, ज्यात ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया यांचा समावेश होतो. फुफ्फुसात पाणी भरल्यावर निमोनिया होतो.
हे ही वाचा :
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !
‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश