Monday, January 13, 2025
Homeआंतरराष्ट्रीयजगातील सर्वाधिक पगार घेतो 'हा' भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

Jagdeep Singh : जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला, आणि अडोबचे शांतनू नारायण यांची नावे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता या सर्वांना मागे टाकत भारतीय वंशाचे जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांनी जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या व्यक्तींच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.

क्वांटमस्केप (Quantumscape) कंपनीचे संस्थापक आणि माजी सीईओ असलेल्या जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांना वार्षिक पगार 17,500 कोटी रुपये मिळाला आहे. म्हणजेच, त्यांना रोजचा पगार तब्बल 48 कोटी रुपये आहे. हा पगार इतका मोठा आहे की अनेक कंपन्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही जास्त आहे.

जगदीप सिंह (Jagdeep Singh) यांनी २०१० साली क्वांटमस्केपची स्थापना केली. ही कंपनी नवीन पिढीच्या सॉलिड-स्टेट रिचार्जेबल लिथियम मेटल बॅटर्‍या तयार करते. या बॅटर्‍यांचा वापर मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EV) केला जातो. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीत क्वांटमस्केपने मोठी झेप घेतली असून, कंपनीमध्ये वोक्सवैगन आणि बिल गेट्स यांसारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनीही भांडवल गुंतवले आहे.

जगदीप सिंह यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून एमबीए पूर्ण केले आहे. कंपनीची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी १० वर्षे विविध कंपन्यांमध्ये काम केले. त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी बॅटरी तंत्रज्ञानातील क्रांतिकारी बदल ओळखला.

क्वांटमस्केप कंपनी २०२० साली अमेरिकन शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. गुंतवणूकदारांनी कंपनीला मोठा पाठिंबा दिला. जगदीप सिंह यांच्या पगार पॅकेजमध्ये 2.3 बिलियन डॉलरचे शेअर्स समाविष्ट होते, ज्यामुळे त्यांचा वार्षिक पगार प्रचंड वाढला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

संबंधित लेख

लोकप्रिय