Rajagopala Chidambaram Death : भारतीय अणुशास्त्राचे जनक मानले जाणारे आणि भारताला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक जगतात शोककळा पसरली आहे.
डॉ. चिदंबरम यांनी १९७४ च्या पोखरण-१ आणि १९९८ च्या पोखरण-२ अणूचाचण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अण्वस्त्रांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त केली.
Rajagopala Chidambaram वैज्ञानिक कारकीर्द आणि सन्मान
- डॉ. चिदंबरम यांनी भारतीय अणुऊर्जा विभाग आणि भाभा अणु संशोधन केंद्रात महत्त्वाची पदे सांभाळली.
- ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार राहिले.
- त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९७५ साली पद्मश्री आणि १९९९ साली पद्मविभूषण या सन्मानाने गौरविण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल भावूक श्रद्धांजली वाहत डॉ. चिदंबरम यांच्या कार्याचा गौरव केला. “भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे,” असे मोदी म्हणाले.
अणुऊर्जा विभागाच्या निवेदनानुसार, “डॉ. चिदंबरम यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला दिशा मिळाली. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.”
हे ही वाचा :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !