Ladaki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची मानली जाणारी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सरकारने या योजनेतील लाभधारक महिलांसाठी दिलासा देणारी घोषणा केली आहे. याअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची रक्कम 1500 रुपयांवरून थेट 2100 रुपये करण्यात येणार आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल. मार्च 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 2100 रुपये जमा केले जातील. या घोषणेमुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. ज्या महिलांनी एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेतला आहे, तसेच ज्या अर्जांमध्ये खोटी माहिती भरली गेली आहे, त्यांना अपात्र ठरवून त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे सरकारने फसवणूक करणाऱ्या अर्जदारांना मोठा धक्का दिला आहे.
योजनेत आणखी 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभधारक महिलांनी आपली कागदपत्रे वेळेत अपडेट करणे गरजेचे आहे.
Ladaki Bahin Yojana
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी 1500 रुपयांची ही रक्कम सुरू केली होती. मात्र, आता ती 2100 रुपयांवर नेण्याचा निर्णय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोठा टप्पा ठरणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठी हा निर्णय मोठी पायरी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?
जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल
अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली