Tuesday, January 14, 2025
Homeताज्या बातम्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

मुंबई : येत्या २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत आयोजित होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) तयारीसाठी आयोजित बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्य महामंडळ, घटक संस्था व आयोजक संस्था सरहद यांच्या संयुक्त बैठकीत संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे वारंवार ही मागणी केली होती. अखेर या मागणीची दखल घेऊन संमेलनाच्या ‘व्हीआयपी’ प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच तालकटोरा मैदानावरील मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात येणार आहे. (Sahitya Sammelan)

मुंबईत झालेल्या या बैठकीत संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांच्या प्रमुखांनी व आयोजकांनी सावरकर यांच्या नावाची मागणी स्वीकारत या निर्णयाला एकमताने मान्यता दिली. या निर्णयाचे सावरकरप्रेमी स्वागत करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा

पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश

संबंधित लेख

लोकप्रिय