मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना 1500 रूपये दिले जातात. मात्र निवडणुकीनंतर लाडकी बहीणचे निकष कठोर करण्यात आले आहेत. ज्या ज्या भागात तक्रारी आल्या त्या भागातील लाभार्थ्यांचे अर्ज आणि कागदपत्रे पुन्हा पडताळली केली जात आहेत. अशात एका महिलेच्या खात्यातील रक्कम सरकारने पुन्हा काढून घेतल्याचे वृत्त समोर आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील भिकूबाई खैरनार या महिलेच्या खात्यावरुन साडे सात हजार रुपये सरकारने काढून घेतले आहेत. या महिलेने पाच हप्त्यांपर्यंत लाभ घेतला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या घटनेचे सत्य समोर आले आहे.
धुळे जिल्ह्यातील भिकूबाई खैरनार यांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे चुकून तिच्या मुलाच्या खात्यात आल्यानंतर प्रशासनाला कळवले. महिलने चुकून मुलाचे आधार कार्ड दिल्याने पैसे तिच्या मुलाच्या खात्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यावर तिने प्रशासनाला स्वतःहून कळवून पैसे परत केले आणि नंतर पुन्हा योग्य पद्धतीने अर्ज करून योजनाचा लाभ घेतला.
राज्य सरकारने निवडणूक होईपर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत सरकरट रक्कम खात्यावर दिली. मात्र निवडणूक झाल्यानंतर मात्र आता त्यावर निकष लावण्यात येत आहे. पुण्यात याआधी 10 हजार अर्ज बाद करण्यात आले. आता पुन्हा अनेक महिला या योजनेतून बाहेर पडतील का हे पहावे लागणार आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी रक्कम ₹1,500 वरून ₹2,100 करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अपात्र अर्जदारांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे योजनेचे निकष आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana योजनेतील महत्वाचे निकष :
- वार्षिक एकत्रित उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास अपात्र.
- आधार कार्ड आणि बँक खात्याच्या नावात तफावत असल्यास अपात्र.
- कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही (ट्रॅक्टर वगळून).
- आयकर भरणारे किंवा सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील सदस्य असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
- इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलाही अपात्र ठरतील.
हे ही वाचा :
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !
‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश