Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणबार्शी मध्ये "भाजप हटाव, देश बचाव" मोहिमेचे पत्रके वाटून सुरुवात

बार्शी मध्ये “भाजप हटाव, देश बचाव” मोहिमेचे पत्रके वाटून सुरुवात

बार्शी : बार्शी मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने “भाजपा हटाव ,देश बचाओ” या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पक्षाचे राज्य नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने पत्रके वाटून करण्यात आली. 14 एप्रिल ते 15 मे 2023 या काळामध्ये ही मोहीम चालवली जाणार आहे.

या पत्रकामध्ये म्हणले आहे , भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता आणि समता हे तत्त्वांना संपुष्टातामध्ये आनत हिंसाचार आणि दडपशाही या मार्गाने भाजप सत्तेवर आहे, ठिक ठिकाणचे पक्ष फोडून घटनात्मक तरतुदींचा भंग करत अनैतिक पद्धतीने भाजपने राज्या राज्यात सत्ता स्थापन केली आहे, सर्वसामान्य जनते विरोधी आर्थिक धोरण राबवत भांडवलदाराना खुले रान केले जात आहे, शेती व शेतकऱ्यांचे नुकसान करून नैसर्गिक आपत्तीत देखील शेतकऱ्यांना मदत नाकारली जात आहे, बेरोजगारी वाढवली जात आहे तर महागाई वाढवत रेशनचे धान्य देणे बंद केले जात आहे, कामगारांची पिळवणूक केली जात आहे , तर युवकांचे भवितव्य हे अंधारमय बनवून टाकले आहे , दलित, अल्पसंख्यांक, लेखक, विचारवंत , साहित्यिक यांच्यावर हल्ले चढवले जात आहेत, सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत आरोग्य व्यवस्था नावाला सरकारी उरली आहे, म्हणून भाजप हटल्याशिवाय देश वाचला जाणार नाही म्हणून ही मोहीम राबवली जात आहे”.

यावेळी कॉ. डॉ. प्रवीण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, भारत भोसले आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय