Tuesday, May 21, 2024
Homeराज्यमोठी बातमी:व्हिडीओ:जायकवाडी पाणलोट क्षेत्रातील सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन

मोठी बातमी:व्हिडीओ:जायकवाडी पाणलोट क्षेत्रातील सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन

पैठण:दि.७-नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो मच्छिमारांनी आज पहाटे पाच वाजताच धरणावर जाऊन मोठे आंदोलन केले,जायकवाडी धरणावर होणारा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस आंदोलनास्थळी दाखल झाले अचानक संतप्त लोकांनी केलेल्या या आंदोलनामुळे पोलीस व स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली.


केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला जायकवाडी धरणावरील १५ हजार एकरातील तरंगता सौर प्रकल्पाविरोधात लढा तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे.
केंद्र सरकारच्या असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास २३ हजाराहून अधिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भिती या जलाशयावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना आहे. तसेच या प्रकल्पामुळे जायकवाडी जलाशयामध्ये असलेले सर्व माशे व जलचर ऑक्सिजन विना मरण पावतील,आणि पर्यावरणाशी संबशीत प्रश्न निर्माण होतील अशी भीती मराठवाड्यात व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाला देखील कोणतेही कल्पना नव्हती.
आंदोलकांना धरणावरून निघून जाण्याची विनंती केली जात आहे. जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीच्या वतीने या सौर प्रकल्पाला विरोध होत आहे.

मराठवाड्यातील संभाजीनगर येथील जायकवाडी धरण हे आशियातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे.पैठणचे संत एकनाथ महाराज यांच्या नावाने येथील पाणलोट क्षेत्रास नाथ सागर जलाशय या नावाने ओळखले जाते.
जलाशय पात्रात पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी म्हटले आहे की,या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय