Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

मोठी बातमी : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

पुणे : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं आज सकाळी निधन झालं आहे. वयाच्या 91 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. (Retired Justice P B Sawant Dies in Pune)

पी. बी. सावंत यांचं आज (सोमवार 15 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता निधन झालं. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला.

पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली; त्याच्या उल्लेखनीय कामांपैकी एक म्हणजे जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांनी जबाबदारी सोडली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय