Friday, May 3, 2024
Homeराज्यमोठी बातमी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

मोठी बातमी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

मुंबई : राज्यभरात दीड महिन्यापासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपाला आज तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या संपाबाबत महिला आणि बाल विकास सचिव अनुप कुमार यादव यांच्या कक्षात आज बैठक पार पडली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन योजना व ग्रॅच्युइटी लागू होणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे आपला संप मागे घ्यावा असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केले. 

तसेच त्यांनी यावेळी मिनी अंगणवाडी सेविका यांचे मोठ्या अंगणवाडी मध्ये रुपांतर केले आहे. सर्व सेविकांन तात्काळ मोबाईल दिले जातील. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना लवकरच मानधन वाढवणे बाबत प्रस्ताव दिला जाईल असे सांगितले. 

यानंतर कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कॉम्रेड एम.ए.पाटील, कॉम्रेड शुभा शमीम, कॉम्रेड आप्पा पाटील, दत्ता देशमुख, दिलीप उटणे, माधुरी क्षीरसागर, सुवर्णा तळेकर, निशा शिवरकर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय