नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS चे 6 कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अल अन्सारी इमाम रजी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही लिहिण्यात आली होती. या संदर्भातील तक्रार दाखल होताच पोलीसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि उन्नावच्या नवाबगंज येथे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी रात्री देण्यात आली. अल अन्सारी इमाम रजी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यात कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये मेसेज लिहण्यात आला आहे. त्यात देशभरातील RSS चे 6 कार्यलये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊमधील मादियानव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लखनौ पोलिस धमक्या देणाऱ्यांचा शोध घेत आहे. आरोपी लवकरच जेरबंद होतील, असे पोलिसांनी सांगितले आहे
सोशल मीडियावरून दिलेल्या या धमकीत लखनऊ, उन्नावमधील नवाबगंज आणि कर्नाटकातील चार ठिकाणच्या संघाच्या कार्यालयांचा समावेश आहे. हा व्हॉट्सअॅप मेसेज आता सोशल मीडियावर (Whatsapp Chat) व्हायरल झाला आहे. हे मेसेज सुलतानपूर येथील एका महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. नीळकंठ पुजारी यांना पाठविण्यात आले आहेत. ते अलीगंज येथील RSS बरोबर देखील जोडले गेलेले आहेत. तसेच आरएसएसचे जुने स्वयंसेवक आहेत.