Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : राज्य सरकार “या” वयोगटातील नागरिकांंना करणार मोफत लस

---Advertisement---

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून ४५ वर्षा वरील नागरिकांना लस देण्यात येत होती. आता १ मी पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. या संबंधीची नोंदणी प्रक्रिया आज पासून सुरू झाली आहे.

दरम्यान, १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लसीकरण देणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles