Sunday, December 8, 2024
Homeसमाजकारणसाक्री : नंदलाल पाडवी यांची बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्षपदी निवड

साक्री : नंदलाल पाडवी यांची बिरसा क्रांती दलाच्या तालुका अध्यक्षपदी निवड

धुळे : बिरसा क्रांती दलाच्या साक्री तालुका अध्यक्ष पदी नंदलाल पाडवी यांची निवड करण्यात आली आहे. मनोज पावरा नाशिक विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 एप्रिल रोजी झूम मिटींग आयोजित करण्यात आली होती. 

या सभेत बिरसा क्रांती दल साक्री तालुका कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्ष नंदलाल पाडवी, उपाध्यक्ष हेमराज गावीत, सचिव तुकाराम बहिरम, कार्याध्यक्ष डाॅ.कुवर साहेब, कोषाध्यक्ष प्रवीण शिंदे, सहसचिव राकेश भारूडे, सल्लागार गंगाधर ठाकरे, महिला प्रतिनिधी आशा भोये, तालुका संघटक बापू चौधरी, प्रसिद्धी प्रमुख प्रवीणकुमार अहिरे, सदस्य लक्ष्मण बागूल, शिवाजी बागूल, जगन जगताप, श्रीकांत शिंदे सह एकूण 90 सदस्यांची निवड करण्यात आली. 

यावेळी कोकण विभाग प्रमुख सुशीलकुमार पावरा, पुणे विभाग प्रमुख दिलीप आंबवणे हे उपस्थित होते. नवनिर्वाचित साक्री तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनोज पावरा यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


संबंधित लेख

लोकप्रिय