Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBhosari Vidhan sabha 2024 : तळवडे भागातील नागरिकांचा वनवास संपवणार- अजित गव्हाणे

Bhosari Vidhan sabha 2024 : तळवडे भागातील नागरिकांचा वनवास संपवणार- अजित गव्हाणे

गेल्या दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार (Bhosari Vidhan sabha 2024)

-रस्ते, पाणी आणि वीज पुरवठ्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची ग्वाही


अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला नागरिकांची गर्दी; विरोधकांना भरली धडकी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : तळवडे परिसरातील मूलभूत समस्या गेली दहा वर्ष ‘जैसे थे आहेत. रेड झोनची टांगती तलवार, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, खड्डे पडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा समस्यांनी नागरिक अक्षरशः वैतागले आहेत.(Bhosari Vidhan sabha 2024)

जाणीवपूर्वक या भागाला सुविधांपासून वंचित ठेवले असल्याची तक्रार प्रत्येक जण करत आहे. या भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे म्हणाले. तळवडेकरांचा हा वनवास आगामी काळात संपवणार असल्याचा विश्वास यावेळी गव्हाणे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) काँग्रेस तसेच इतर घटक पक्षांचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ तळवडे भागामध्ये गुरुवारी पदयात्रा काढण्यात आली. तळवडेचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराजांना श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. भैरवनाथांच्या चरणी दंडवत घालत अजित गव्हाणे यांनी नाथ साहेबांचा आशीर्वाद घेतला.

या दरम्यान गव्हाणे यांनी तळवडेतील ज्योतिबा मंदिरातही दर्शन घेतले. पदयात्रेला माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, रवी लांडगे, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे , धनंजय आल्हाट, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय भालेकर,रवींद्र आप्पा सोनवणे, माजी सरपंच चिंतामण भालेकर, विकास साने, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शीला शिंदे, शिवसेना भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब नरळे, रावसाहेब थोरात, सुखदेव आप्पा नरळे , विभाग प्रमुख नितीन भोंडे, गणेश भिंगारे, राहुल पवार, संजय चव्हाण ,प्रवीण पिंजन ,खंडू आप्पा भालेकर ,राजू कहार, प्रकाश गाडे, रमेश बाठे, लक्ष्मण कामटे, के डी वाघमारे, दिनकर भालेकर, शिवाजी नखाते, अंकुश नखाते, चिंतामणी भालेकर, संतोष केकाळे, लक्ष्मण हगवणे, रंगनाथ भालेकर, जयश्री बाठे, सीमा पिंजन आदी उपस्थित होते.

गव्हाणे यावेळी म्हणाले, तळवडे परिसरातील नागरिकांशी अनेकदा चर्चा होते. या भागातील मुख्य समस्या रस्त्यांची असल्याचे नागरिक सांगतात. लघुउद्योजक रस्ते आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे अतिशय त्रस्त आहेत. तळवडे परिसरात मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आहेत. या कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी गेल्या दहा वर्षात रस्ता करून दिला नाही. प्रत्येक कामात आडकाठी केली. या भागांमध्ये चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कामात अडथळा निर्माण केला गेला. निधी दिला नाही.

त्यामुळे या परिसराचा गेल्या दहा वर्षात विकास होऊ शकला नाही. या भागाला प्राधान्याने रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दहा वर्षात याकडे अतिशय मोठे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या भागात दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कनेक्टिंग रस्ते निर्माण करण्यास सत्ताधारी कमी पडले. त्यामुळेच नागरिक परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहेत. आगामी काळात हाच विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे असे देखील गव्हाणे म्हणाले.

पंकज भालेकर म्हणाले गेल्या दहा वर्षात तळवडे भागाला निधी देण्यात दुजाभाव केला गेला. तळवडेमध्ये अनेक भूमिपुत्र रेड झोनमुळे बाधित आहेत. या रेड झोन प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केली. गेल्या दहा वर्षात त्यांनी रेड झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणता पुढाकार घेतला.

हे नागरिकांना दाखवून द्यावे. गेल्या पंचवार्षिक मध्ये या भागात चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. आम्ही पाठपुरावा करत होतो मात्र पालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला निधी मिळू नये याचा पुरेपूर बंदोबस्त करण्यात आला होता. त्यामुळे या भागात सुविधांचा अभाव निर्माण झाला.

विरोधी गटात निराशेचे चित्र!

अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रा, गाठीभेटी आणि रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चऱ्होली, मोशी चिखली तळवडे या भागांमध्ये अजित गव्हाणे यांच्या पाठिंब्यासाठी जमा होत असलेली गर्दी पाहून विरोधकांना चांगलीच धडकी भरल्याचे दिसत आहे.

दरम्यान विरोधकांच्या गडातील शिलेदार बाहेर पडत असल्यामुळे भाजपला एकीकडे गळती लागलेली असतानाच दुसरीकडे नागरिकांचाही पाठिंबा कमी होत आहे त्यामुळे नैराश्याचे चित्र विरोधी गटात निर्माण झाले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय