Saturday, April 27, 2024
HomeNewsमोखाडा पंचायत समितीच्या सभापती पदी भास्कर थेतले बिनविरोध

मोखाडा पंचायत समितीच्या सभापती पदी भास्कर थेतले बिनविरोध

प्रतिनिधी:पालघर सौरभ कामडी
मोखाडा पंचायत समिती सभापती व उपसभापती (बाळासाहेबांच्या शिवसेनेचे) सभापती पदी भास्कर थेतले व उप सभापती पदी प्रदीप वाघ यांची खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली.तीन जिल्हापरिषद व सहा पंचायत समिती गण असलेल्या मोखाडा पंचायत समितीत ५ सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तर एक राष्ट्रवादी काँग्रेस चा सदस्य त्यामुळे शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे.


ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होण्यासाठी जेष्ठ नेते प्रल्हाद कदम,जि.प.सदस्य प्रकाश निकम,जि.प.सदस्य सारिका निकम,नगराध्यक्ष अमोल पाटील,उप नगराध्यक्ष नवसु दिघा,वासुदेव खंदारे आदींनी परिश्रम घेतले होते.


यावेळी पं.स.सदस्य अनिता बंडू पाटील,पं.स.सदस्य युवराज गिरांधले,मा.सभापती आशा झुगरे,मा.उप सभापती लक्ष्मीताई भुसारा,मा.नगरसेवक देविदास काकड,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दया भुसारा,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोकाशी,रामदास कोरडे,सरपंच प्रकाश भोंडवे,अनुराग निकम,गारे सर,अमोल जाधव,लक्ष्मण खुताडे,भास्कर दिघा,गणेश पाटील,बाळा म्हसरे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय