पुणे : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर दगडफेक, चप्पलफेक करत हिंसक आंदोलन केलं होतं.
या घटनेनंतर भाजप नेते व माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेला बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय गायकवाड यांनी अनिल बोंडेंचं नाव न घेता खोचक शब्दात टीका केली आहे.
इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा !
भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत, असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला आहे. शरद पवारांच्या कामाची उंची हे कधीच समजू शकत नाही. शरद पवार गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत, मात्र ते कधीही कोणाला वाईट बोलले नाही. त्यांच्या घरावर अशा पद्धतीने हल्ला होणं हे दुर्दैवी, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरूनच शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन झालं, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. तर महाविकास आघाडी सरकार स्थिर असून विरोधक त्यांच्या कामात यशस्वी होणार नाहीत, असा इशारा देखील गायकवाड यांनी दिला आहे.