Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडलिंगायत दफनभुमीच्या जागेत तातडीने पोयटा माती भरण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू

लिंगायत दफनभुमीच्या जागेत तातडीने पोयटा माती भरण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू

पिंपरी चिंचवड : मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीची जागा अपुरी असल्यामुळे तसेच तेथील दुरावस्थेमूळे अंत्यसंस्कार करण्यास जागा शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे मागील काही दिवसापासुन फुटपाथ फोडुन त्या जागेत अंत्यविधी सुरु होते. 

या गंभीर प्रकाराची दखल माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी घेतली आणि सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन दि.१६ नोव्हेंबर रोजी आयुक्त राजेश पाटील, महापौर उषा ढोरे यांना निवेदन देऊन दफनभूमी परिसरातील झाडेझुडपे काढावीत, दफनभूमी क्र. १ येथील अंत्यविधी करण्यात आलेल्या जागेतील माती काढुन ती सुयोग्य ठिकाणी टाकुन या जागेत चार फुट नवीन पोयटा माती भरावी अथवा आहे त्या मातीवरच चार फुट नव्याने माती भरावी म्हणजे वरील सर्व परिसरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येचे निराकरण होईल. अशा आशयाचे पत्र दिले होते.

त्यानंतर महापालिका प्रशासनाने दफनभूमी परिसरातील जागेचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली, चार फूट अतिरिक्त पोयटा माती टाकण्यास सुरवात केली आहे. मनपाने तातडीने दखल घेतल्यामुळे मोरवाडी येथील लिंगायत दफनभूमी स्वछ आणि प्रशस्त होईल असे मारुती भापकर यांनी आयुक्त आणि महापौरांचे आभार व्यक्त करताना सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय