Saturday, May 18, 2024
Homeराज्यकाळजी घ्या! उन्हाच्या झळा वाढणार, राज्यात आज 'या' ठिकाणी उष्णतेची लाट

काळजी घ्या! उन्हाच्या झळा वाढणार, राज्यात आज ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट

पुणे: काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सियसच्या वर पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.जळगावमध्ये पारा 44.6 अंशावर पोहोचला होता. या वर्षीचे हे राज्यातील सर्वोच्च तापमान ठरलं आहे. तर आज राज्यातील काही भागात हवामान विभागाने उष्ण लाटेचा इशारा दिला आहे.

कमाल तापमान 40 अंशांच्या वर आणि सरासरीच्या तुलनेत तापमान 4.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले असल्यास उष्णतेची लाट आली असं समजले जाते. राज्यात गुरुवारी जळगावात 44 अंशांच्या वर तापमान होतं. तर अकोल्यात 43.5 आणि धुळ्यात 42.0 अंश सेल्सियस तापमान नोंद झालं.

विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर होता.हवामान विभागाने महाराष्ट्रात आज उष्ण कोरडं हवामान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कमाल तापमानात वाढ होईल असंही म्हटलंय. दमट आणि उष्ण हवामानामुळे त्रास होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 42 ते 45 अंश सेल्सियसवर तर पुण्यात 40 आणि मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सियसवर पोहचेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

संतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय