पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय तसेच सर्व संघटनांच्या वतीने शनिवारी (दि.9) पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली होती. Bandh successful at Chikhli, Krishnanagar, Akurdi
आकुर्डी, चिखली, कृष्णानगर, संभाजीनगर, थर्माक्स चौक परिसरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट), शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपनगरातील मुख्य चौकात मराठा आरक्षणाच्या संबंधी लोकजागृती केली. चिखली, आकुर्डी, शाहूनगर, संभाजीनगर, मोरेवस्ती येथील सर्व दुकाने व दैनंदिन व्यवहार बंद होते.
या बंद आंदोलनात काशिनाथ संभाजी जगताप, रावसाहेब चंद्रकांत थोरात, नेताजी काशीद, प्रशांत जाधव, मंगेश खंडागळे, सचिन सानप, माधव पाटील, विजय पिरंगुटे, सुदाम शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या या प्रमुख कार्यकर्त्यांनी बंदला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले.