औरंगाबाद : शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यांचे सीटूच्या वतीने जिल्हाधिकारी, कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देेेतेवेळी कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. शंकर ननुरे, कॉ. मीरा जाठवे उपस्थित होते.
शालेय पोषण आहार कामगार संघटना संलग्न सीटू संघटना औरंगाबाद च्या वतीने आज संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले.
■ कामगारांच्या मागण्या खालील प्रमाणे :
● कामगार विरोधी कायद्दे रद्द झाले पाहिजे.
● सेंटर किचन पद्धत रद्द झाली पाहिजे.
● शालेय पोषण आहार कामरांना नियमित मानधन द्या.
● शालेय पोषण आहार कामरांना कोरोणा काळात १०,००० रुपये अनुदान द्या.
● आयकर लागू नसलेल्या शालेय पोषण आहार कामरांना ७,५००रुपये दर महा अनुदान द्या.
● तामिळनाडू राज्या प्रमाणे शालेय पोषण आहार कामरांना दरमहा ११,००० रुपये मानधन द्या.
● शालेय पोषण आहार कामरांना स्वंयपाकी दर्जा द्या.