Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अवकाळी पावसाने कासारवाडी नासिक हायवेवर झाडे कोसळली

PCMC : अवकाळी पावसाने कासारवाडी नासिक हायवेवर झाडे कोसळली

पिंपरी चिंचवड : आज सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने नासिक हायवे भोसरी कासारवाडी येथील रस्त्यावर झाडे कोसळली आहेत.

साडेपाच वाजता अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वारा यामुळे कासारवाडी वरून नाशिक (nasik highway) कडे जाताना रस्त्यावर अनेक मोठमोठे झाडे उन-मळून पडल्यामुळे जवळपास दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या.

एमआयडीसीतील वाहतूक टेल्को मार्गे तर वळवण्यात आली आणि पिपळे सौदागर येथील 8 टु 80 गार्डन वाहनांच्या दोन किलोमिटर रांगाच रांगा लागल्या होत्या एकतर्फीच वाहतूक होती. pcmc news

पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. या परिसरातून कामावरून घरी जाणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड यांनी सांगितले की, आज दिवसभर सर्वाधिक तापमान शहरात होते.

त्यामुळे वेगवान सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. PCMC NEWS

अनेक गाड्यावर झाडे कोसळली, यामध्ये मध्ये ट्रक, टेंपो, कार,रिक्षा समावेश होता, गाड्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

साडेपाच वाजता घरातून निघालेले कामगार वर्ग आठ वाजे तरी घरी पोहोचलेले नव्हते, जीव मुठीत घेऊन एकतर्फीच वाहन चालत होते, प्रत्यक्ष दर्शनी अण्णा जोगदंड यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय